Sunday, March 20, 2022

जागतिक चिमणी दिन २० मार्च

जागतिक चिमणी दिन २० मार्च
     
जागतिक Sparrow day
कालच म्हणे साजरा झाला 
इतर days प्रमाणेच त्यालाही
शुभेच्छांचा वर्षाव खुप झाला  ।। १।।

माझ्या सप्तरंगी Message ने
पिलांचा एक थवा माझ्याकडे आला
थोडेसे Grains, थोडेसे Cold Water
रोज तुझ्या अंगणात ठेवत जा म्हणाला  ।। २।।

काल म्हणे सगळीकडेच अंगणात
दिसत होते थोडेसे Granis आणि पाणी
आमचा photo आणि Video काढायचा
म्हणून नाहीच हुसकावून लावलं कोणी  ।। ३।।

माझ्याकडे थोडं सहानुभूतीने बघत
एक chicks हळुच कानी कुजबुजलं
त्याच्या Mind मध्ये साठलेलं सारं दु:ख
त्यानी माझ्याजवळ हलकेच व्यक्त केलं ।। ४।।

माणसांनी आमचं अस्तित्व नष्ट करुन
आमच्या Home वर मिळवलाय  ताबा
या Cement च्या जंगलात पुन्हा
भेटतील का गं आमचे आई बाबा  ।। ५।।

मोठ मोठी  झाडे तोडून माणसांनी
अनेक मजली Building त्यावर  बांधले
आमची घरटी ,आमचा संसार मोडून त्यांचे
खरंच होणार आहे म्हणता का चांगले?  ।। ६।।

Sister, निदान तु तरी आमच्यासाठी
एक तरी Big Big  असं Tree लाव
पुन्हा सावलीचा  शोध घेतघेत  येऊन
तुझ्या कानी आमचा  गुंजवू दे गं कलरव  ।। ७।।

कवयित्री
संगीता भांडवले
वाशी ,उस्मानाबाद
9923445306

21मार्च 2022




Wednesday, December 23, 2020

कविता

ची स्पर्धेसाठीची

     🎯।।कविता।।🎯

एक,दोन,......,पाच करत
भुलविलेस त्या अबलांना
वचन देऊन जन्मजन्मांतराचे
का दुखविलेस तिच्या मनाला
वेळ येताच जबाबदारीची
फसविलेस ना त्या सहावीला ।।१।।

भुलली तुझ्या सत्याला
भुलली तुझ्या निष्ठेला
ओवाळुन टाकला जीव
भेदुन सा-या परंपरेला
वेळ येताच जबाबदारीची
फसविलेस ना त्या सहावीला ।।२।।

का ?खेळलास तिच्या भावनांशी
का?कलंकित केलेस तिच्या शिलाला
का?दिलास छेद तिच्या विश्वासाला
का?जपला नाहीस दिलेल्या शब्दांना
वेळ येताच जबाबदारीची
फसविलेस ना त्या सहावीला ।।३।।

प्रेम हा शब्दच का वांझ झाला
देऊन फसव्या शब्दांचा सहारा
का,कायमचा असा दुरावला
भेटली का सातवी तुला?
आता तरी जप तिला
वेळ येताच जबाबदारीची
फसविलेस ना त्या सहावीला ।।४।।

नको असलेल्या शब्दांतुन
का तोडलेस तिला मनातुन
संशयाने दुर का केलेस तिला
तनामनातुन का हाकललेस तिला
वेळ येताच जबाबदारीची
फसविलेस ना त्या सहावीला ।।५।।

✍🏼संगीता भांडवले✍🏼
     वाशी, उस्मानाबाद

Wednesday, July 22, 2020

मोकळा श्वास

 :मोकळा श्वास
मोकळा श्वास घेण्यासाठी
उद्यानं ही झाली सील बंद
कोरोनाच्या  या महामारीत
पर्यावरण रक्षणाचे जपुया छंद

✍️संगीता भांडवले आहेत ug

     वाशी उस्मानाबाद
   दि २२ जुलै २०२०

श्रावणसरी

बालगीत*आमची मनी*

बालगीत   (मनी)
आमची मनी
आहे गुणी
चेंडु खेळते
घरभर पळते
उंदीर दिसताच 
मागे धावते
सा-या घरात
घालुन गस्त
दुधाचे पातेले
करते फस्त
डोळे तिचे 
फारच छान
कान मात्र
फारच लहान
पिल्ले तिची
गोरीगोरीपान
दिसतात किती
छान छान !
            संगीता भांडवले
       मु.अ.जि.प.प्रा.शा.शेंडी
   ता.वाशी जि.उस्मानाबाद

Sunday, July 19, 2020

कविता *माझी बहीण*

  ।।माझी बहिण।। 

बहिण माझी लहान
गोष्टी करते मोठ्या
म्हणे बालपणी मी
होते सर्वांची लाडकी  ।। १।। 

सर्वच करायचे लाड
तशी ती लाडावली
अभ्यासात मात्र
फार नाही रमली  ।। २।। 

कला गुण तिच्यात
भरले होते ठासून
रांगोळी, मेहंदीत तर
फारच होती निपुण  ।। ३।। 

लहान तोंडी मोठा घास
फाडफाड बोलायची
राग शांत होताच
क्षणात मला बिलगायची  ।। ४।। 

बहिण माझी गुणी
नेहमी होती हसतमुख
संसारात ही रमली छान
तिला गृहलक्ष्मीचा मान  ।। ५।। 

असली कितीही नाती
तरी बहिणीची सर नाही
तिचे हट्ट पुरवायला
अजुन कुणी दमत नाही  ।। ६।। 

माहेरची लहान धाकटी
सासरला झाली थोरली
संसाररुपी सागरात
नाव तिची तरली   ।। ७।। 

संसारातील जबाबदा-या
पार पाडते दक्षतेने
सुख आणि दु:खात
साथ देते बरोबरीने  ।। ८।। 

माया, ममता, वात्सल्याचे
आहे मूर्तीमंत उदाहरण
रुप आणि सौंदर्याची
आहे ती लावण्यवती  ।। ९।। 

दिवाळी, राखी पुनवेला
औक्षण करते भावाला
पंचप्राणाने ओवाळले म्हणून
ओवाळणी मागते वहिणीला  ।। १०।। 

पुढील पिढीची
सतावते चिंता
भावाला भाऊ नाही
बहिणीला बहिण नाही  ।। ११।। 

*हम दो हमारा एक* चा
मंत्र जपतो आम्ही
बहिण भावाच्या नात्याला
कवितेतूनच वाचणार का तुम्ही?  ।। १२।। 

*संगीता भांडवले*
वाशी उस्मानाबाद


Thursday, June 18, 2020

कविता शहीद जवान

अंत:करणास भेदून जाईल
आर्त हाक त्या वीर पत्नीची
कोण जाणावे दु:ख तिचे
कशी समजूत काढेल लेकरांची

अंत:करणास भेदून जाईल
टाहो त्या वीर मातेचा
कोण जाणावे दु:ख तिचे
झाला शहीद पुत्र पोटचा

अंत:करणास भेदून जाईल
रिती कुस  त्या वीर मातेची
कोण जाणावे दु:ख तिचे
गाथा पराक्रमाच्या शौर्याची
 
अंत:करणास भेदून जाईल
वेडी माया बहिणीची
कोण जाणावे दु:ख तिचे
हिंमत तिच्या धैर्याची

अंत:करणास भेदून जाईल
आक्रोश त्या वीर पित्याचा
मातृभूमीच्या रक्षणासाठी
अभिमान मुलाच्या बलिदानाचा

संगीता भांडवले 
वाशी ,उस्मानाबाद