*माझा वर्ग माझा उपक्रम*💐💐💐💐💐💐विद्यार्थिनी सूर्वी बनसोडे हिचा वाढदिवस उत्साहात साजरा
💐💐💐💐💐💐
पी. एम. श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिवशक्तीनगर, वाशी, जिल्हा धाराशिव येथे इयत्ता चौथीची विद्यार्थिनी सूर्वी बनसोडे हिचा वाढदिवस आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी सूर्वी हिने आपल्या वाढदिवसानिमित्त सर्व शिक्षक ,वर्गमित्र व मैत्रिणींना लेखन साहित्याचे वाटप करून आनंद द्विगुणित केला.
शाळेतील शिक्षकांनी सूर्वी हिला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. विद्यार्थ्यांनीही वाढदिवसाचे गीत गाऊन तिला शुभेच्छा दिल्या. या आनंददायी उपक्रमामुळे शाळेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
💐💐💐💐💐💐
✒️शब्दांकन
*श्रीमती संगीता भांडवले*