Wednesday, August 10, 2016

माझी शाळा-माझा उपक्रम

🔵  *माझी शाळा -माझा उपक्रम*🔵
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेंडी ता. वाशी. जि. उस्मानाबाद*

🌹 _*दे टाळी* 🌹
     ~~~~~~~~~~

☘ _*हेतू*_ ☘

☘महिन्यांची नांवे क्रमाने म्हणता येणे.
☘चालु महिन्याचे नांव सांगता येणे.
☘ _*साहित्य*_ - साहित्याची आवश्यकता नाही.
🔻_*कृती*_ 🔻
☘प्रथम विद्यार्थ्यांचा वर्गातच बसून एक गोल करावा .
☘बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांला आपले दोन्ही हात मांडीवर तळहात वर करून ठेवाण्यास सांगावे. .
☘प्रत्येक विद्यार्थ्याच्या डाव्या हाताच्या तळहातावर शेजारील विद्यार्थ्याचा उजवा तळहात वर करून ठेवावा . .
☘कोणत्याही एका विद्यार्थ्यांपासून इंग्रजी महिने बारा-जानेवारी म्हणत सुरूवात करून त्या विद्यार्थ्यांने डाव्या बाजूच्या विद्यार्थ्याच्या उजव्या तळहातावर टाळी द्यायची .
☘दुसर्या विद्यार्थ्यांने फेब्रुवारी म्हणत तिसऱ्याच्या तळहातावर टाळी द्यावी .तिसऱ्याने चौथ्या च्या ,चौथ्या ने पाचव्या च्या हातावर टाळी देत महिन्यांची नांवे म्हणावीत.
☘अशा रितीने हसत खेळत जानेवारी ते डिसेंबर महिन्याची नांवे विद्यार्थ्यांच्या स्मरणात राहतील.
☘विद्यार्थ्यांना हा उपक्रम खेळताना खूप मज्जा येते.विद्यार्थी आनंदाने उपक्रमात सहभागी होतो .
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎾🎾🎾 *पुरक*  *उपक्रम*🎾🎾🎾
१.मराठी महिन्यांची नांवे.
२.आठवड्यांच्या वारांची नांवे.
३.Days of week.
४.1 ते 100 अंक क्रमाने वाचन.
५.रंगांची नांवे .
६.टप्प्याने येणा-या संख्या.(२चा,५चा,१०चा टप्पा इ.)
७.सम संख्या.
८.विषम संख्या.
( *त्या त्या* *इयत्तेच्या काठिण्य पातळीनुसार* )
√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√
      *इत्यादी*..........
*पुरक उपक्रम शिक्षकांच्या कल्पकतेनुसार घेता येतील*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

✍🏻 *संगीता* *भांडवले*✍🏻
*मु* *अ* *जि* *प* *प्रा* *शाळा* *शेंडी*
  *ता* *वाशी* *जि* *उस्मानाबाद*
   myshikshankatta.blogspot.com
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
*आपणांस हा उपक्रम कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया जरुर कळवा*
    या व अशाच काही उपक्रमाला ,बालकविता व चारोळी लेखन यासाठी माझ्या ब्लॉगला एक वेळ आवश्य भेट द्या व प्रतिक्रिया नोंदवा,सुचनांचे स्वागत केले जाईल.👏🏼
http://myshikshankatta.blogspot.com

Wednesday, July 20, 2016

मुल समजुन घेताना

सध्या पालकांचे दोन वर्ग दिसुन येतात.शिक्षा करुन मुलांवर योग्य संस्कार घडविता येतात असे मानणारे व संयमाने त्यांच्या भावना जाणुनघेणारे पालक.प्रत्येकच लहान मोठ्या चुकांना शिक्षा करणे योग्य नव्हे.काही पालक तर एवढी कठोर शिक्षा करतात की,अंगावर आगदी काटाच उभा राहतो.सध्या RTE act 2009 मधील कलम १७ नुसार बालकांना शारीरिक शिक्षाव मानसिक त्रास यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
मी सध्या ज्या शाळेत आहे तेथे घडलेला किस्सा मी सांगते.ऋतुजा ही इ.२रीतील विद्यार्थिनी,अगदी हुशार व चुणचुणीत.स्वच्छता व टापटीप,वक्तशीरपणा,आज्ञाधारकपणा इ.गुणसंपन्न मुलगी.परंतु एके दिवशी परिपाठ चालु असतानाच तिची आई तिला घेऊन आली व ओक्साबोक्सी रडु लागली.काय करावे कळेचना!एवढ्यात त्यांनीच स्वत:ला सावरत सांगण्यास सुरुवात केली.माझ्यासह सर्व विद्यार्थ्यांनाही अश्रु आवरता आले नाहीत.ऋुतुजाच्या पाठीवर काळेनिळे वळ उमटले होते.याचे कारण म्हणजे तिने घरातील १०००रु ची नोट १०रु समजुन खाऊ खाण्यास आणली पण खेड्यात सकाळी १०वा दुकाने बंद व रात्री पुन्हा चालु .तो पर्यंत तिने ती नोट मैत्रिणीच्या आईकडे ठेवण्यास दिली.त्यांनी लगेच ओळखले की हिने न सांगताच घरातील पैसे आणलेत.संध्याकाळी तिची आई वआजीला ती नोट देउन त्या घरी गेल्या .झाला प्रकार ऋुतुजाच्या वडिलांस समजला.त्यांनी तिला बेल्टने एवढे मारले की काळेनिळे वळच ऊमटले.किती ही अघोरी शिक्षा.खुप गंभीर बाब ही.तिच्या आईशी बोलताना समजले की,आम्ही तिला कोणतीही गोष्ट मागण्यापुर्वीच हजर करतो.तिला कशाचीच कमतरता नाही.तरीही तिने घरातच चोरी करावी ही खुप काळजी करण्याची बाब आहे असं त्या म्हणाल्या.मी श्रुतुजाला जवळ घेऊन समजावले.तर तिने सांगीतले की ,मला ही कधीकधी मैत्रिणींबरोबर खाऊ खावा वाटतो.घरी पैसे मागितले तर देत नाहीत म्हणुन मी चोरी केली.तिनेअगदी प्रमाणिकपणे कबुल केले.पुढे सलग काही दिवस परिपाठातच चोरी करणे किती चुक आहेहे कथेद्वारे समजुन सांगीतले.तेंव्हापासुन ऋुतुजाच काय पण शाळेतील एकाही विद्यार्थ्याची चोरीविषयक घरी अथवा शाळेत तक्रार नाही.याचे मला खुपखुप समाधान आहे.सध्या ऋतुजा इ.४थीत आहे.मला एवढेच सांगावेसे वाटते की,खुप अघोरी शिक्षा करुन मुलांवर संस्कार होतात हा चुकीचा समज आहे.संस्कार हे करायचे नसतात तर ते रुजवायचे असतात.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
   .......संगीता भांडवले
      वाशी, उस्मानाबाद

Thursday, June 30, 2016

निरोप

निरोप
~~~~~~~~
निरोप घेतोस हरकत नाही
एकदा मला पाहुन जा
डोळ्यातील अश्रु पुसुन जा !

नाते तोडतोस हरकत नाही
रोखलेला श्वास पाहुन जा
उडालेेला विश्वास देऊन जा!

हे सारे संपवताना
बोल माझे ऐकुन जा
जातो आहेस हरकत नाही
एकदा तरी पाहुन जा!
~~~~~~~~~~~~~~~
    संगीता भांडवले
     वाशी उस्मानाबाद

Monday, May 23, 2016

चित्रशलाका मोगरा,प्रथम क्रमांक प्राप्त

चित्रशलाका -मोगरा ************************* तुझ्या उमलत्या ओजस्वी पंखांना समजुन घेऊन बळकटी देते नीट झेपावण्यासाठी उत्तुंग आभाळ देताना घालुनी तिच्या पायात संरक्षणाचे बुट ! ...संगीता भांडवले वाशी, उस्मानाबाद

माणुसकी खरा धर्म-मोगरा

दि.१२/५/२०१६ ---------------------------------------- ख-या धर्माची शिकवण सर्वांप्रती असावी आपुलकी फेडावे यातुन समाजॠण जपावी ह्रदयात माणुसकी ! .....संगीता भांडवले वाशी, उस्मानाबाद ----------------------------------------------- नको उणी दुणी नको हेवा दावा माणुसकीचा धर्म मनातुन जपावा ! --------------------------------------------- माणसाने माणसाला माणसासारखे वागवावे निभावुन माणुसकीचा धर्म माणुसकीलाच जपावे ! ------------------------------------------------------- निभावुन खरा माणुसकीचा धर्म जाणुन इतरांचे वर्म करावे चांगले कर्म ! ....संगीता भांडवले मु अ जि प प्रा शा शेंडी वाशी, उस्मानाबाद

ऊन्हाळी सुट्टी धमाल मोगरा

दि.१८/५/२०१६ विषय:उन्हाळी सुट्टी धमाल **************************************** खेळु दे ना दादा मला आहे उन्हाळी सुट्टी एवढ्याशाच कारणावरुन का करतोस गट्टी ! ....संगीता भांडवले(१६) वाशी, उस्मानाबाद -------------------------------------------------- लागलीय उन्हाळी सुट्टी करु फुल टु धमाल खेळ,गाणी,गोष्टींची करुयात कमाल !! ------------------------------------------- अभ्यासाला कट्टी मित्रांशी गट्टी फुल टु धमाल उन्हाळी सुट्टी !! ------------------------------------------------ लुटुयात आनंद उन्हाळी सुट्टीचा भरुन काढु गँप आजींच्या गोष्टींचा !! --------------------------------------------------- बाबांनी काम सांगताच आईची नेते स्कुटी मन मोकळे खेळु द्या ना मला आहे उन्हाळी सुट्टी!! .....संगीता भांडवले वाशी, उस्मानाबाद Dnyaansanjivani. blogspot. in

सुसंस्कार

***सुसंस्कार*** -------------------------------------------------------- प्रथमत: संस्कार म्हणजे काय ते पाहु... सं--संस्कृतीरक्षक स्--स्वावलंबी का--कार्यकुशल र--रचनात्मक प्रत्येक पालकाला वाटते आपल्या मुलावर चांगले संस्कार झाले पाहिजेत.ते तसा प्रयत्नही करत असतात.बालकांवर योग्य संस्कार करणे हे मातापित्याचे प्रथम कर्तव्य आहे.आई ही बालकाची प्रथम गुरु असते.तिने अगदी गर्भापासुऩच आपल्या बालकांवर उत्तम संस्कार केलेले असतात. प्रत्येक पालकाला वाटते आपल्या मुलावर चांगले संस्कार, योग्य जडणघडण व्हावी. भारताचा एक सुजान नागरिक बनविण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतात. काहींना तर बालपणापासुनच याचे योग्य ज्ञान मिळते.कारण मुलांवर संस्कार हे त्याच्या कुटुंब,समाज,शाळा व परिसर यातुनच होत असतात.म्हणुन प्रत्येकाच्या कुटुंबात योग्य आचारविचारांची माणसे असली तर त्या पिढीतील मुलांवर उत्तमोत्तम संस्कार होतात.पुर्वी एकत्र कुटुंब पद्धतीत मुलांना घरातील सर्वांच्या वागण्या-बोलण्यातुन आपोआपच संस्कार घडायचे.हल्ली विभक्त कुटुंब पद्धतीत आई-बाबा, शाळा,मित्र यावरच संस्काराची शिदोरी अवलंबुन राहिली आहे. संस्कार हेआपोआप होत नसतात ते रुजवावे लागतात.यासाठी कुटुंबाबरोबर परिसर व शाळेचाही या घटकावर परिणाम जाणवतो.हल्ली मित्रांबरोबर,किंवा वाढत्या तंत्रज्ञानामुळे मुलांवर योग्य संस्कार केले तरी ती बिघडण्याची शक्यताच जास्त वाढली आहे. तरीही आपण प्रयत्न करणे गरजेचे आहे. वेळोवेळी त्यांना त्यांच्या भविष्याची जाणीव करुन देणे आवश्यक आहे. आजची ही तरुण पिढी फँशनच्या नावाखाली,पाश्चात्य संस्कृतिचे अनुकरण करत, व्यसनी,व्यभिचारी बनत चालली आहे.भारतीय संस्कृती सोडुन पाश्चात्य संस्कृतीमुळे ही पिढी बरबाद होऊ लागली आहे.प्रत्येक आई-बाबांचा हा चिंतेचा विषय बनत चालला आहे. आजच्या राजकारणात तर अशा बिघडलेल्या तरुण पिढीचा वापर सर्रास होताना दिसतो. तरुणाई डिजेच्या तालावर थरकतेय.योग्य वयात म्हणजे बालवयातच बालकांवर उत्तम संस्कार झाले नाहीत तर या अशा घटऩांना सामोरे जावे लागते म्हणुन प्रत्येक जबाबदार पालकांचे एकच कर्तव्य आहे ते म्हणजे आपली पिढी सुशिक्षित बरोबरच सुसंस्कारित केली पाहिजे. ----------------------------------------------------------------------- .......संगीता भांडवले मु अ जि प प्रा शा शेंडी ता वाशी, जि उस्मानाबाद