Monday, July 31, 2017

My school-My Activity 2017-18

My school-My Activity  2017-18

*विद्यार्थी वाढदिवस साजरा करणे*

आज दि ३१/७/२०१७ रोजी कु.समीक्षा रामचंद्र वीर इ.४थी हिचा वाढदिवस शालेय परिपाठात साजरा केला.सर्व मित्र मैत्रीणिंने शुभेच्छा दिल्या.समीक्षा ने सर्वांना चॉकलेट दिले.वाढदिवस म्हंटलं की मुले खुप आनंदी असतात ना!
   या सर्वांचे  माझ्या कँमे-यात कैद आजचे हसरे क्षण....

शब्दांकन..

संगीता भांडवले
मुख्याध्यापक
जि प प्रा शा शेंडी
ता वाशी जि उस्मानाबाद

Sunday, July 30, 2017

ध्यास ।आठोळी।


_______________

🌹ध्यास🌹
==============

मनी ध्यास घेतला
विद्यार्थी प्रगत करण्याचा
रुजवून ज्ञानरचनावाद
महाराष्ट्र प्रगतीकडे नेण्याचा

मनी ध्यास घेतला
गुणवत्तापुर्ण शिक्षण देण्याचा
डिजीटल वर्ग,डिजीटल शाळा.
वापर माहीती तंत्रज्ञानाचा.!

✍🏻संगीता भांडवले✍🏻
     वाशी,उस्मानाबाद

*

Shared with https://goo.gl/9IgP7

Saturday, July 29, 2017

प्रथम क्रमांक प्राप्त चारोळी

*==============
मनभावन माझा श्रावण
सप्तरंगाने  सजला
श्रावणसरींनी शृंगारले
हिरव्यागार वसुंधरेला

   ✍🏻संगीता भांडवले✍🏻
      वाशी,उस्मानाबाद
     दि २७/७/२०१७*

चारोळी

जागतिक लोकसंख्या दिन ११जलै

कविता,॥निरोप॥

कविता,॥झोका॥