Monday, May 23, 2016

चित्रशलाका मोगरा,प्रथम क्रमांक प्राप्त

चित्रशलाका -मोगरा ************************* तुझ्या उमलत्या ओजस्वी पंखांना समजुन घेऊन बळकटी देते नीट झेपावण्यासाठी उत्तुंग आभाळ देताना घालुनी तिच्या पायात संरक्षणाचे बुट ! ...संगीता भांडवले वाशी, उस्मानाबाद

माणुसकी खरा धर्म-मोगरा

दि.१२/५/२०१६ ---------------------------------------- ख-या धर्माची शिकवण सर्वांप्रती असावी आपुलकी फेडावे यातुन समाजॠण जपावी ह्रदयात माणुसकी ! .....संगीता भांडवले वाशी, उस्मानाबाद ----------------------------------------------- नको उणी दुणी नको हेवा दावा माणुसकीचा धर्म मनातुन जपावा ! --------------------------------------------- माणसाने माणसाला माणसासारखे वागवावे निभावुन माणुसकीचा धर्म माणुसकीलाच जपावे ! ------------------------------------------------------- निभावुन खरा माणुसकीचा धर्म जाणुन इतरांचे वर्म करावे चांगले कर्म ! ....संगीता भांडवले मु अ जि प प्रा शा शेंडी वाशी, उस्मानाबाद

ऊन्हाळी सुट्टी धमाल मोगरा

दि.१८/५/२०१६ विषय:उन्हाळी सुट्टी धमाल **************************************** खेळु दे ना दादा मला आहे उन्हाळी सुट्टी एवढ्याशाच कारणावरुन का करतोस गट्टी ! ....संगीता भांडवले(१६) वाशी, उस्मानाबाद -------------------------------------------------- लागलीय उन्हाळी सुट्टी करु फुल टु धमाल खेळ,गाणी,गोष्टींची करुयात कमाल !! ------------------------------------------- अभ्यासाला कट्टी मित्रांशी गट्टी फुल टु धमाल उन्हाळी सुट्टी !! ------------------------------------------------ लुटुयात आनंद उन्हाळी सुट्टीचा भरुन काढु गँप आजींच्या गोष्टींचा !! --------------------------------------------------- बाबांनी काम सांगताच आईची नेते स्कुटी मन मोकळे खेळु द्या ना मला आहे उन्हाळी सुट्टी!! .....संगीता भांडवले वाशी, उस्मानाबाद Dnyaansanjivani. blogspot. in

सुसंस्कार

***सुसंस्कार*** -------------------------------------------------------- प्रथमत: संस्कार म्हणजे काय ते पाहु... सं--संस्कृतीरक्षक स्--स्वावलंबी का--कार्यकुशल र--रचनात्मक प्रत्येक पालकाला वाटते आपल्या मुलावर चांगले संस्कार झाले पाहिजेत.ते तसा प्रयत्नही करत असतात.बालकांवर योग्य संस्कार करणे हे मातापित्याचे प्रथम कर्तव्य आहे.आई ही बालकाची प्रथम गुरु असते.तिने अगदी गर्भापासुऩच आपल्या बालकांवर उत्तम संस्कार केलेले असतात. प्रत्येक पालकाला वाटते आपल्या मुलावर चांगले संस्कार, योग्य जडणघडण व्हावी. भारताचा एक सुजान नागरिक बनविण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतात. काहींना तर बालपणापासुनच याचे योग्य ज्ञान मिळते.कारण मुलांवर संस्कार हे त्याच्या कुटुंब,समाज,शाळा व परिसर यातुनच होत असतात.म्हणुन प्रत्येकाच्या कुटुंबात योग्य आचारविचारांची माणसे असली तर त्या पिढीतील मुलांवर उत्तमोत्तम संस्कार होतात.पुर्वी एकत्र कुटुंब पद्धतीत मुलांना घरातील सर्वांच्या वागण्या-बोलण्यातुन आपोआपच संस्कार घडायचे.हल्ली विभक्त कुटुंब पद्धतीत आई-बाबा, शाळा,मित्र यावरच संस्काराची शिदोरी अवलंबुन राहिली आहे. संस्कार हेआपोआप होत नसतात ते रुजवावे लागतात.यासाठी कुटुंबाबरोबर परिसर व शाळेचाही या घटकावर परिणाम जाणवतो.हल्ली मित्रांबरोबर,किंवा वाढत्या तंत्रज्ञानामुळे मुलांवर योग्य संस्कार केले तरी ती बिघडण्याची शक्यताच जास्त वाढली आहे. तरीही आपण प्रयत्न करणे गरजेचे आहे. वेळोवेळी त्यांना त्यांच्या भविष्याची जाणीव करुन देणे आवश्यक आहे. आजची ही तरुण पिढी फँशनच्या नावाखाली,पाश्चात्य संस्कृतिचे अनुकरण करत, व्यसनी,व्यभिचारी बनत चालली आहे.भारतीय संस्कृती सोडुन पाश्चात्य संस्कृतीमुळे ही पिढी बरबाद होऊ लागली आहे.प्रत्येक आई-बाबांचा हा चिंतेचा विषय बनत चालला आहे. आजच्या राजकारणात तर अशा बिघडलेल्या तरुण पिढीचा वापर सर्रास होताना दिसतो. तरुणाई डिजेच्या तालावर थरकतेय.योग्य वयात म्हणजे बालवयातच बालकांवर उत्तम संस्कार झाले नाहीत तर या अशा घटऩांना सामोरे जावे लागते म्हणुन प्रत्येक जबाबदार पालकांचे एकच कर्तव्य आहे ते म्हणजे आपली पिढी सुशिक्षित बरोबरच सुसंस्कारित केली पाहिजे. ----------------------------------------------------------------------- .......संगीता भांडवले मु अ जि प प्रा शा शेंडी ता वाशी, जि उस्मानाबाद

अरुणा शानबाग यांच्या स्मृतीदिनानिमित्त काव्यमय आदरांजली

केईएम रुग्णालयातील नर्स अरुणा शानबाग यांच्यावर १९७३ मध्ये अत्याचार झाला,४२वर्षे त्या कोमात होत्या.गेल्या वर्षी १८मे रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त काव्यमय आदरांजली. अरुणा शानबाग- काव्यमय आदरांजली ---------------------- संगीता भांडवले वाशी, उस्मानाबाद ********************""**************************** कर्नाटकची अरुणा मुंबईत आली मात्र वॉर्डबॉयने अत्याचार करुन ती कायमची कोमात गेली ।।१।। अरुणाला माहित होते सोहनलालचे गुढ तक्रारीच्या भितीनेच त्याने घेतला सुड ।।२।। दारुच्या व्यसनापायी कुत्र्याचे खाणे चोरुन नेई दांड्या मारण्यात झाला पटाईत अरुणाने दम दिला म्हणुनच तो संतापला ।।३।। अरुणाने तुला समजावला,धमकावला संतापुन तु राक्षसी अत्याचार केला का रे सोहनलाल तु नाही कळवळला कुत्र्याच्या साखळीणेच गळा आवळला ।।४।। न्यायदेवता आपली आंधळी बलात्काराची शिक्षा नाही झाली फक्त खुणाचा प्रयत्न?? आरोप झाला सात वर्षेच तुला तुरुंगवास भोगावा लागला ।।५।। शिक्षा भोगलीस पण सुड कायम राहिला कोमातील अरुणावर हल्ल्याचा प्रयत्न केला मात्र आजुबाजुच्या लोकांनीच तो हाणुन पाडला ।।६।। लग्न ठरले डॉक्टरांशी म्हणुन ती सुखावली लग्नासाठी पैशांची तरतुद ही केली ।।७।। भावाचा पत्कारुन विरोध बहिणीचा पाठिंबा मिळविला सुखी संसाराची स्वप्ने पाहतानाच तिच्यावर दुर्दैवी प्रसंग ओढवला ।।८।। अरुणा तुझी कशी ही करुन कहाणी आवडायची ना तुला जुनी गाणी ।।९।। अरुणा कोमातुन बाहेर येईना रुग्णालयाने तगादा लावला सहकारणीने संप पुकारला परिस्थितीस तिच्या रुग्णालयच जबाबदार धरला ।।१०।। अरुणाला दयामरण द्यावे मागणी केली पिंकी विराणीने फेटाळली ती सर्वोच्च न्यायालयाने म्हणे घटनेने अधिकार दिला जगण्याचा नाही मृत्युला कवटाळण्याचा ।।११।। नातेवाईक,सगे सोयरे यांनी अरुणाकडे फिरवली पाठ केईएम परिचारिकांनीच सांभाळली जबाबदारी ताठ ।।१२।। गेली कोमात,जगली ती बेचाळीस वर्ष नाही झाला तिला फायदा अरुणानेच मिळवुन दिला भारताला दयामरणाचा ऐतिहासीक कायदा ।।१३।। ......संगीता भांडवले मु. अ .प्रा .शाळा शेंडी ता.वाशी जि.उस्मानाबाद

।।मोगरा।।

--------------------------------------------------------- ।।मोगरा।। कुठेच नाही चारापाणी सुनसान पडल्या दावणी सर्जा-राजाला माझ्या घेऊन जातेय छावणी ! संगीता भांडवले वाशी, उस्मानाबाद ************************************* समाजबंधनाचा जुगारुन बुरखा चालवतेय आता बैलगाडी भाऊ माझा पाठीराखा संग सर्जा- राजाची जोडी ! ---------------------------------------------------------- वाढु दे कितीही भाव नाही इंधनाचा भार ही बैलगाडीच जणु माझा नैनो कार ! -------------------------------------------------- रस्त्यात असु देत खड्डे नाही अपघाताची भिती बैलगाडीच धावते पुढे नको ती हेल्मेटची सक्ती ------------------------------------------------------ प्रत्येक क्षेत्रात महिलांनी घेतलीय आघाडी चालवितात कशा शिताफिने सर्जाराजाची बैलगाडी ! ------------------------------------------------------- नको ती सहानुभुती नको तो आसरा माझ्याच हातात प्रगतीचा कासरा ! ...…संगीता भांडवले वाशी, उस्मानाबाद

।।मोगरा।।

।।मोगरा। --------------------------------------------------------- कुठेच नाही चारापाणी सुनसान पडल्या दावणी सर्जा-राजाला माझ्या घेऊन जातेय छावणी ! संगीता भांडवले वाशी, उस्मानाबाद ************************************* समाजबंधनाचा जुगारुन बुरखा चालवतेय आता बैलगाडी भाऊ माझा पाठीराखा संग सर्जा- राजाची जोडी ! ---------------------------------------------------------- वाढु दे कितीही भाव नाही इंधनाचा भार ही बैलगाडीच जणु माझा नैनो कार ! -------------------------------------------------- रस्त्यात असु देत खड्डे नाही अपघाताची भिती बैलगाडीच धावते पुढे नको ती हेल्मेटची सक्ती ------------------------------------------------------ प्रत्येक क्षेत्रात महिलांनी घेतलीय आघाडी चालवितात कशा शिताफिने सर्जाराजाची बैलगाडी ! ------------------------------------------------------- नको ती सहानुभुती नको तो आसरा माझ्याच हातात प्रगतीचा कासरा ! ...…संगीता भांडवले मु अ जि प प्रा शा शेंडी ता वाशी, जि उस्मानाबाद

Sunday, May 22, 2016


बालकविता ।।सुट्टी।। खेळु दे न दादा मला आता आहे सुट्टी एवढ्याशाच कारणावरुन का करतोस कट्टी ।।१।। सा-या घरादाराचा तु आहेस कसा लाडका दोघांच्याही लाडात असा फरकच का? ।।२।। दादा तु खट्याळ अन् आहेस किती हट्टी बाबांनी काम सांगताच आईची नेतोस स्कुटी ।।३।। तुटकी खेळणी दे मला अन् नवीन घे तुला आता तरी दादा मला खेळु दे ना? ।।४।। समजाविते दादा तुला नको होऊस हट्टी रडु येतेय मला आता करु नको ना कट्टी ।।५।। शाळा सुरु होताच शाळेशी होईल गट्टी मन मोकळे खेळु दे ना आता आहे सुट्टी ।।६।। ...संगीता भांडवले-रणदिवे मु.अ.जि .प .प्रा .शा .शेंडी ता.वाशी जि .उस्मानाबाद Dnyaansanjivani.. blogspot. in

Thursday, May 12, 2016

चारोळी


----------------------------------------
ख-या धर्माची शिकवण
सर्वांप्रती असावी आपुलकी
फेडावे यातुन समाजॠण
जपावी ह्रदयात माणुसकी  !
       .....संगीता भांडवले
          वाशी, उस्मानाबाद
-----------------------------------------------
नको उणी दुणी
नको हेवा दावा
माणुसकीचा धर्म
मनातुन जपावा !
---------------------------------------------
माणसाने माणसाला
माणसासारखे वागवावे
निभावुन माणुसकीचा धर्म
माणुसकीलाच जपावे !
-------------------------------------------------------
निभावुन खरा
माणुसकीचा धर्म
जाणुन इतरांचे वर्म
करावे चांगले कर्म !
         ....संगीता भांडवले
          वाशी, उस्मानाबाद

Tuesday, May 3, 2016

अविस्मरणिय क्षण

माझ्या मित्रपरिवारातील लग्नाचा हा अविस्मरणिय क्षण.अगदी कुठेही लग्नाला जायचे म्हंटले की मी या गोष्टी आवर्जुन तपासते. माझ्या मैत्रिणीच्या मुलीचे लग्न चाऱवर्ष्यापुर्वी झाले.लग्न मुलाकडे म्हणजेच सांगलीला होते.लग्नाची सर्व तयारी जोरात झाली होती.आदल्यादिवशी नवरी हळदीसाठी व व-हाड दोन्हीही सोबतच निघणार होते.लग्नात द्यायचे सर्व सामान एका रुममध्ये ठेवले होते.बस्ता,पाहुण्यांच्या बँगा सर्व एकाच ठिकाणी ठेवले होते. नवरीमुलीचे सर्व सामान उदा.साड्या,शालु,दागिऩे,मेकअप किट याच्या दोन बँगा वेगळ्याच काँटवर ठेवल्या होत्या.शिदोरी,सामान ठेवलंय का?म्हणुन पुरुषमंडळी सारखी विचारत होती.पाठवणीच्या नादात अन् रडारडीच्या गोंधळातच सर्वचजण ठेवलंय ठेवलंय म्हणुन नवरीला हळदीला पाठवुन रात्री व-हाड पण निघाले.दुस-या दिवशी हळदीसाठी नवरीमुलीचे दागिऩे, साड्या, शालुची मागणी वरपक्षाकडुन झाली. मग बँगा ची शोधाशोध सुरु.कुठेच पत्ता नाही.मग शेवटी लक्षात आले की या बँगा बहुतेक घरीच राहिल्या असतील.ऐनवेळी काय करावे समजेना.काऱण अंतर पण खुप लांबचे.माझ्या मैत्रिणीच्या लक्षात आले बँगा कॉटवर ठेवल्या होत्या.शिदोरी आली मग बँगा कशा नाहीत?तर्क-वितर्क सुरु झाले.नवरी मुलगी तर काय? आकाश कोसळल्यागत धाय मोकलुन रडु लागली.कारण सर्वच सामान उदा दागिऩे, साड्या, मेकअप यापैकी काहीच नाही,,, मी ऐनवेळी काय करु?कसे करु?सर्वांनी तिला समजावले.कसेतरी नवरीमुलीच्या बापाने पैशाची जुळवाजुळव करुन ऐनवेळी आवश्यक ते सामान,,शालु,दागिऩे मित्रांच्या मदतीने आणले.या सर्व धावपळीत लग्न जरा उशीराच लागले.लग्नात दिवसभर याचीच चर्चा. दुस-या दिवशी घरी आल्यावर पाहतात तर काय? बँगा कॉटवर नसुन कॉटखाली कुणीतरी मुद्दामच सरकावुन ठेवलेल्या होत्या.सामानाच्या आडबाजुला ठेवले होते.किती हा खोडसाळपणा.कुणीतरी जवळच्याच नातेवाईकाने हे काम केले असणार ना?जातानाच लगीनघाईत त्यांनी फायदा घेतला पण असा आसुरी आनंद घेऊन त्यांना काय मिळाले असेल बरं!! पण माझ्या मात्र हा प्रसंग कुठेही लग्नाला गेले की एकदम डोळ्यासमोर उभा राहतो.त्या नवरीमुलीचा चेहरा आठवतो.असा प्रसंग पुन्हा कधी येऊ नयेे म्हणुन मी ज्या ज्या वेळी नातेवाईकांच्या लग्नात जाते ना तेंव्हा नवरी जाताना हळद असो की पाठवणी.नवरीमुलीच्या सामानाच्या बँगा ठेवल्यात का?हे अगोदर मी आवर्जुन पाहते. संगीता भांडवले

अविस्मरणिय क्षण

माझ्या मित्रपरिवारातील लग्नाचा हा अविस्मरणिय क्षण.अगदी कुठेही लग्नाला जायचे म्हंटले की मी या गोष्टी आवर्जुन तपासते. माझ्या मैत्रिणीच्या मुलीचे लग्न चाऱवर्ष्यापुर्वी झाले.लग्न मुलाकडे म्हणजेच सांगलीला होते.लग्नाची सर्व तयारी जोरात झाली होती.आदल्यादिवशी नवरी हळदीसाठी व व-हाड दोन्हीही सोबतच निघणार होते.लग्नात द्यायचे सर्व सामान एका रुममध्ये ठेवले होते.बस्ता,पाहुण्यांच्या बँगा सर्व एकाच ठिकाणी ठेवले होते. नवरीमुलीचे सर्व सामान उदा.साड्या,शालु,दागिऩे,मेकअप किट याच्या दोन बँगा वेगळ्याच काँटवर ठेवल्या होत्या.शिदोरी,सामान ठेवलंय का?म्हणुन पुरुषमंडळी सारखी विचारत होती.पाठवणीच्या नादात अन् रडारडीच्या गोंधळातच सर्वचजण ठेवलंय ठेवलंय म्हणुन नवरीला हळदीला पाठवुन रात्री व-हाड पण निघाले.दुस-या दिवशी हळदीसाठी नवरीमुलीचे दागिऩे, साड्या, शालुची मागणी वरपक्षाकडुन झाली. मग बँगा ची शोधाशोध सुरु.कुठेच पत्ता नाही.मग शेवटी लक्षात आले की या बँगा बहुतेक घरीच राहिल्या असतील.ऐनवेळी काय करावे समजेना.काऱण अंतर पण खुप लांबचे.माझ्या मैत्रिणीच्या लक्षात आले बँगा कॉटवर ठेवल्या होत्या.शिदोरी आली मग बँगा कशा नाहीत?तर्क-वितर्क सुरु झाले.नवरी मुलगी तर काय? आकाश कोसळल्यागत धाय मोकलुन रडु लागली.कारण सर्वच सामान उदा दागिऩे, साड्या, मेकअप यापैकी काहीच नाही,,, मी ऐनवेळी काय करु?कसे करु?सर्वांनी तिला समजावले.कसेतरी नवरीमुलीच्या बापाने पैशाची जुळवाजुळव करुन ऐनवेळी आवश्यक ते सामान,,शालु,दागिऩे मित्रांच्या मदतीने आणले.या सर्व धावपळीत लग्न जरा उशीराच लागले.लग्नात दिवसभर याचीच चर्चा. दुस-या दिवशी घरी आल्यावर पाहतात तर काय? बँगा कॉटवर नसुन कॉटखाली कुणीतरी मुद्दामच सरकावुन ठेवलेल्या होत्या.सामानाच्या आडबाजुला ठेवले होते.किती हा खोडसाळपणा.कुणीतरी जवळच्याच नातेवाईकाने हे काम केले असणार ना?जातानाच लगीनघाईत त्यांनी फायदा घेतला पण असा आसुरी आनंद घेऊन त्यांना काय मिळाले असेल बरं!! पण माझ्या मात्र हा प्रसंग कुठेही लग्नाला गेले की एकदम डोळ्यासमोर उभा राहतो.त्या नवरीमुलीचा चेहरा आठवतो.असा प्रसंग पुन्हा कधी येऊ नयेे म्हणुन मी ज्या ज्या वेळी नातेवाईकांच्या लग्नात जाते ना तेंव्हा नवरी जाताना हळद असो की पाठवणी.नवरीमुलीच्या सामानाच्या बँगा ठेवल्यात का?हे अगोदर मी आवर्जुन पाहते. संगीता भांडवले मु. अ .जि. प .प्रा .शा .शेंडी ता .वाशी जि .उस्मानाबाद