कविता
।।एक क्षण।।
नेहमी हवा असतो
एक क्षण प्रेमाचा
कायम स्मृतित राहतो
एक शब्द मायेचा
नेहमी हवा असतो
एक क्षण नवनवा
मना मनात रुजतो
मायेचा ऊबदार ठेवा
नेहमी हवा असतो
एक क्षण एकांताचा
मना मनात जागतो
खजिना सद्भावनांचा
नेहमी हवा असतो
एक क्षण आठवांचा
तुझ्या सहवासातील
माझ्या आनंदाचा.....
✍🏻संगीता भांडवले✍🏻
वाशी,उस्मानाबाद
९९२३४४५३०६
No comments:
Post a Comment