कविता
।।वृद्धाश्रम॥
जन्मदात्यांच्या नशिबी
वृध्दाश्रम का यावा
ओझे वाटतेय मुलांना
असा भोग का यावा ॥१॥
वृध्दाश्रमातील एकांतात
दाटुन येतात आठवणी
मोकळ्या वाटा अश्रुला
नयनात येते पाणी ॥२॥
वृद्धाश्रमाच्या खोलीतच
माझ्या ममतेस पुर येई
तुझ्या सुखी संसाराला
आई आशिर्वाद दुरुनच देई ॥३॥
वृद्धाश्रमाच्या चार भिंतीतच
हुरहुर वाटते मनाला
काळजाच्या तुकड्याने
का माझा त्याग केला ॥४॥
वृद्धाश्रमाच्या वाटेवर
नजर माझी थकली
भेटत जा रे एकदा तरी
चिंता करतेय तुझी माऊली ॥५॥
वृद्धाश्रमाच्या सानिध्यातच
हृदय आतुरले माझे
सोन्यासम संसार अन्
सुखी आहे ना कुटुंब तुझे ॥६॥
वृद्धाश्रमाचे जीवन
नको कुणाच्या वाटेला
वर्षातुन एकदा तरी
हार घालत जा फोटोला। ॥७॥
संगीता भांडवले
वाशी,उस्मानाबाद
९९२३४४५३०६
Shared with https://goo.gl/9IgP7
No comments:
Post a Comment