Sunday, December 10, 2017

चारोळ्या,,,स्पर्धेतील

[16/07 7:21 pm] sangita bhandwale: मनसोक्त साहित्य समुह आयोजित,
शब्द चारोली स्पर्धा,दि.१६/७/२०१७

स्पर्धेसाठी

लग्नाच्या प्रेमात राणा,
अंजली  बेधुंद झाली
चिंब ओल्या स्पर्शासाठी
दोघांनीही छत्री दूर केली

✍🏻संगीता भांडवले✍🏻
      वाशी,उस्मानाबाद
[16/07 8:34 pm] sangita bhandwale: *साहित्य काव्यगंध आयोजित जलद चारोली स्पर्धा
विषय:ऋतु हिरवा  दि.१६/७/२०१७

पावसाच्या पडता सरी
धरती ल्याली शालु नवा
निसर्गरंगाची करण्या उधलण
आला  ऋतु हिरवा

✍🏻संगीता भांडवले✍🏻
      वाशी,उस्मानाबाद*
[20/07 11:34 am] sangita bhandwale: प्रतिबिंब
पाण्यातील प्रतिबिंब पाहुन
नाही आवरला मोह कुत्र्याला
उघडुन आपले तोंड
मुकला मिळलेल्याही घासाला

✍🏻संगीताभांडवले✍🏻
       वाशी,उस्मानाबाद
[21/07 6:34 pm] sangita bhandwale: स्पर्धेसाठी

*हरवलेलं प्रेम*

अहंकाराच्या गर्तेत
प्रेम माझे हरवलेलं
गवसेल का मज पुन्हा
प्रेमवैभव तसंच असलेलं
***********************
✍🏻संगीता भांडवले✍🏻
       वाशी,उस्मानाबाद
[22/07 8:40 pm] sangita bhandwale: तुझ्या २ेशमी केसावर
शोभतो हा गजरा
तुझे सौंदर्य खुलवतोय
हा सुगंधित मोगरा
[22/07 10:01 pm] sangita bhandwale: डोळ्यातील काजळ
पहारा तुझ्या सौंदर्याचा
लागु नये नजर कुणाची
तु तुकडा माझ्या काळजाचा

✍🏻संगीता भांडवले✍🏻
     वाशी,उस्मानाबाद
[22/07 10:05 pm] sangita bhandwale: डोळ्याची काजळी
काळजात भिडली
गालावरची खळी
गालातच लाजली

संगीता भांडवले
[22/07 10:09 pm] sangita bhandwale: नयनातील काजळाने
दिसती टपोरे डोळे
अजुनही तु माझीच
हे मानते मन माझे भोळे

संगीता भांडवले
[22/07 10:16 pm] sangita bhandwale: जवळ तु येताच
नयन माझे चुरचुरते
सखे तुझ्या डोळ्यातले
काजळ मज बोचते

संगीता भांडवले
[25/07 6:22 am] sangita bhandwale: डोळ्यातील काजळ
पहारा तुझ्या सौंदर्याचा
लागु नये नजर कुणाची
तु तुकडा माझ्या काळजाचा

✍🏻संगीता भांडवले✍🏻
     वाशी,उस्मानाबाद

डोळ्याची काजळी
काळजात भिडली
गालावरची खळी
गालातच लाजली

संगीता भांडवले
वाशीउस्मानाबाद

नयनातील काजळाने
दिसती टपोरे डोळे
अजुनही तु माझीच
हे मानते मन माझे भोळे

संगीता भांडवले
वाशी,उस्मानाबाद

जवळ तु येताच
नयन माझे चुरचुरते
सखे तुझ्या डोळ्यातले
काजळ मज बोचते

संगीता भांडवले
वाशी,उस्मानाबाद

Shared with https://goo.gl/9IgP7
[25/07 12:24 pm] sangita bhandwale: 🌹साहित्य  स्पंदन समुह ,कुही आयोजित🌹
🎯चित्रचारोळी स्पर्धा,दिः25/7/2017🎯
============================
ना घर,ना दार
आम्ही अनाथ बालक
मायेचा देऊन हात
कुणी होईल का पालक?

✍🏻संगीता भांडवले✍🏻
     वाशी,उस्मानाबाद

Shared with https://goo.gl/9IgP7
[27/07 4:49 pm] sangita bhandwale: *==============
मनभावन माझा श्रावण
सप्तरंगाने  सजला
श्रावणसरींनी शृंगारले
हिरव्यागार वसुंधरेला

   ✍🏻संगीता भांडवले✍🏻
      वाशी,उस्मानाबाद
     दि २७/७/२०१७*
[30/07 8:54 pm] sangita bhandwale: 🎯मनसोक्त साहित्य समुह आयोजित
चारोळी स्पर्धा दि.३०/७/२०१७🎯

विषयःकारगील यशोगाथा

१३५० सैनिक झाले जखमी
५२४ जणांनी लावले प्राण पणाला
कारगील युद्धात शहीद होऊन अनेकांनी
विजयपथ भारतास मिळवुन दिला 

✍🏼संगीता भांडवले ✍🏼
    वाशी,उस्मानाबाद
[30/07 10:32 pm] sangita bhandwale: कोमल फुलांसह
काटयांनाही जपावे
हृूदयाच्या कुपीत जसे
सुगंधी अत्तर ठेवावे

✍🏼संगीता भांडवले✍🏼
[30/07 10:37 pm] sangita bhandwale: का जिवाला जाळतेस
बरसु दे श्रावणसर
प्रेमावर नको काळे ढग
होऊ दे बरसात मुसळधार

✍🏼संगीता भांडवले✍🏼
[01/08 7:33 pm] sangita bhandwale: साहित्य स्पंदन समुह कुही स्पर्धा
चित्र चारोली ,स्पर्धेसाठी....

बापावर  माया 
सानुल्या  परीची
नाही येणार सर
त्याला हजार पोराची

✍🏼संगीता भांडवले✍🏼
      वाशी,उस्मानाबाद
[02/08 9:01 pm] sangita bhandwale: 🌹साहित्य काव्यगंध समुह आयोजित चारोली स्पर्धा🌹
🎯विषय:घुसमट           दि.२/८/२०१७🎯

स्पर्धेसाठी

अपेक्षांचे लादुन ओझे
समाधान मानतात पालक
घुसमट होते त्यांच्या मनाची
मग चुकीच्या मार्गी बालक

✍🏼संगीता भांडवले✍🏼
       वाशी,उस्मानाबाद
[08/08 4:30 pm] sangita bhandwale: स्पर्धेसाठी
बहिण भावाचं नातंच
अबोल निरागस निर्मळ
हम 'दो'हमारा 'एक' मग
भविष्यात नातंच होईल का दुर्मिळ?

✍🏻संगीता भांडवले✍🏻
     वाशी,उस्मानाबाद
[22/08 1:58 pm] sangita bhandwale: 💦💦💦💦💦💐💦💦💦💦💦

                        🏵 *उपक्रम*🏵

*दिनांक :- २२/०८/२०१७ साहित्य काव्यगंध चारोळी कट्टा १ समूह आयोजित उपक्रम*
*वेळ सकाळी १०:३० ते रात्री १२:००*

*_उपक्रम विषय :-" भास /आभास "_*

तुझा भास क्षितीजासारखा
सतावतात खुप  आठवणी
तुझ्या भेटीसाठी प्रिया
चालत  आले अनवाणी !

✍🏻संगीता भांडवले✍🏻
     वाशी,उस्मानाबाद

💦💦💦💦💦💐💦💦💦💦💦
[24/08 1:36 pm] sangita bhandwale: स्पर्धेसाठी
विषय: अर्धांगिनी

अर्धांगिनी अर्धांगिनी म्हणुनच,समाजाने

अधिकारापासुन वंचित ठेवले स्त्रीला

विविध क्षेत्रे करून काबीज तिने

पूर्णांगी बनून दाखवले जगाला.

✍🏻संगीता भांडवले✍🏻
      वाशी,उस्मानाबाद
[24/08 1:50 pm] sangita bhandwale: स्पर्धेसाठी
विषय:"नातं तुझ्या-माझ्यातले

नातं तुझ्या माझ्यातले
मी मनातुन जपले
तुझ्या संशयी नजरेने मात्र
एका क्षणात उध्वस्त केले

✍🏻संगीता भांडवले✍🏻
      वाशी,उस्मानाबाद
[11/09 2:47 pm] sangita bhandwale: *आज चारोळी साठी शब्द:-*

🍂🍂🍂🍂🍂🍂
*निर्दयी मन तुझे*
🍂🍂🍂🍂🍂

निर्दयी मन तुझे
जाळल्यास भावना
करून शब्दांचे वार
तु दुर गेलास ना!

✍🏻संगीता भांडवले✍🏻
      वाशी,उस्मानाबाद
[11/09 3:00 pm] sangita bhandwale: अंगणातील फुलावर
फुलपाखरु बागडते
पायीचे रुणुझुणु पैंजन
कानी रुंजी घालते!

✍🏻संगीता भांडवले✍🏻
     वाशी,उस्मानाबाद
[11/09 3:16 pm] sangita bhandwale: सागराच्या ओढीने
धावते सरिता
आठवांच्या क्षणांची
लिहावी प्रेमगीता

✍🏻संगीता भांडवले✍🏻
      वाशी,उस्मानाबाद
[11/09 6:16 pm] sangita bhandwale: तिन्ही सांज होताच
दिवा लावते देवाला
एकच मागणे मागेल
दे सत्याचे बळ लेखणीला!

✍🏻 संगीता भांडवले✍🏻
    वाशी,उस्मानाबाद
[12/09 2:31 pm] sangita bhandwale: चित्रचारोळी
स्पर्धेसाठी

सौभाग्यालंकार लेवुन
वाट पाहते प्रियाची
हळुच येऊन टिपावी
लाली मज ओठांची

✍🏻संगीता भांडवले✍🏻
    वाशी,उम्मानाबाद
[13/09 8:42 pm] sangita bhandwale: स्पर्धेसाठी आठोळी
विषयः शोधू कशाला सावली

वटवृक्षासम तुझा आधार
शोधू कशाला मी सावली 
तुझा मदतीच्या हाताने
आठवली माय माऊली

उदार तुझ अंतःकरण
किती सुख दुःखे झेलली
तुझ्या सहवासात आहे
आता शोधु कशाला सावली

✍🏻संगीता भांडवले✍🏻
     वाशी,उस्मानाबाद
[21/09 5:47 pm] sangita bhandwale: स्पर्धेसाठी
विषय:आदिशक्ती

तंत्रज्ञान युगातील
मी डिजिटल नारी
आदिशक्तीच्या रुपाने
क्षेत्रे काबीज केली सारी

✍🏻संगीता भांडवले✍🏻
        वाशी,उस्मानाबाद
[22/09 8:02 pm] sangita bhandwale: स्पर्धेसाठी
उत्तुंग घे भरारी

पादाक्रांत केली यशाची शिखरे
सिद्ध केले तुझे अस्तित्व
घे गगणात उत्तुंग भरारी
दाखवुन दे जगाला तुझे कर्तृत्व

✍🏻संगीता भांडवले✍🏻
      वाशी,उस्मानाबाद
[28/09 6:05 pm] sangita bhandwale: स्पर्धेसाठी

विषय:साथ तुझी

सात जन्माची साथ
लाभावी तुझी मला
तुझ्या गुलाबी स्पर्शाने
मदधुंद केले मला

✍🏻संगीता भांडवले✍🏻
     वाशी,उस्मानाबाद
[03/10 9:14 pm] sangita bhandwale: साहित्य स्पंदन समुह आयोजित चित्रचारोळी
स्पर्धेसाठी

हिरव्यागर्द झाडीत
जलाशय विस्तारला
मनसोक्त विहारण्याचा
बदकांनी आनंद लुटला

✍🏻संगीता भांडवले✍🏻
    वाशी,उस्मानाबाद
[03/10 9:27 pm] sangita bhandwale: चांदराती फिरताना
चंद्रमाही लाजला
दिसत नाही हल्ली
प्रश्न त्यालाही पडला

संगीता भांडवले
[03/10 10:40 pm] sangita bhandwale: चांदणकांती लावण्याला
सख्या भुललास ना?
पुनवरातीला फिरताना
चेहरा न्याहळलास ना?

✍🏻संगीता भांडवले✍🏻
[10/10 7:21 pm] sangita bhandwale: स्पर्धेसाठी चित्रचारोळी

चंद्रासहित चांदणीचे प्रतिबिंब
दिसे शांत निळ्या जलाशयात
तु पुन्हा भेटशील या आशेवर
स्तब्ध उभा मी स्वप्न घेऊन नयनात

✍🏻संगीता भांडवले✍🏻
     वाशी,उस्मानाबाद
[24/10 6:14 pm] sangita bhandwale: स्पर्धेसाठी

उघड्यावरच्या  संसारातुन
मुल्य रुजवले स्त्री-पुरुष समानता
कुठले आलेय वास्तुशास्त्र
तरीही गुण्यागोविंदाने नांदता?

✍🏻संगीता भांडवले✍🏻
    वाशी,उस्मानाबाद
[31/10 3:09 pm] sangita bhandwale: स्पर्धेसाठी

अन्नासाठी वणवण
दाही दिशा फिरतो
मिळेल जो घासतुकडा
आम्ही आंनदाने खातो

✍🏻संगीता भांडवले✍🏻
      वाशी,उस्मानाबाद
[31/10 11:14 pm] sangita bhandwale: स्पर्धेत
१६.
अंतरातल्या त्या वेदना
तुलाही होत असतील
सोडुन पुरुषी अहंकार
कधी मला बिलगशील

संगीता भांडवले
वाशी उस्मानाबाद
[02/11 1:36 pm] sangita bhandwale: स्पर्धेसाठी
*विषय:समानता*

भारतीय संस्कृतीत
विविधतेतुन एकता
शालेय जिवनात रुजावे
मुल्य स्त्री पुरुष समानता

✍🏻संगीता भांडवले✍🏻
      वाशी,उस्मानाबाद
[09/11 6:59 pm] sangita bhandwale: स्पर्धेसाठी

*आशय आयुष्याचा*

प्रेमाने धुंद स्वप्न नगरीत
भार झाला तुझ्या आरोपांचा
एकदा माझ्या नजरेतुन बघ
अर्थ समजेल पुर्ण आयुष्याचा

✍🏻संगीता भांडवले✍🏻
      वाशी,उस्मानाबाद
[09/11 7:08 pm] sangita bhandwale: स्पर्धेसाठी

विषय: *क्षण माझे फुलले*

रुसव्या फुगव्यातुन
नाते आपुले बहरले
तुझ्या सहवासाने
क्षण माझे हे फुलले

✍🏻संगीता भांडवले✍🏻
      वाशी,उस्मानाबाद
[09/11 7:18 pm] sangita bhandwale: स्पर्धेसाठी

*आशय आयुष्याचा*

प्रेमाने धुंद स्वप्न नगरीत
भार झाला तुझ्या आरोपांचा
एकदा माझ्या नजरेतुन बघ
आशय समजेल पुर्ण आयुष्याचा

✍🏻संगीता भांडवले✍🏻
      वाशी,उस्मानाबाद
[20/11 11:12 pm] sangita bhandwale: ।।मोगरा।।
तुझ्या विरहाने
अंतरात वेदना
लेखणीतुन उमटल्या
मनातील भावना

संगीता भांडवले
वाशी उस्मानाबाद
[21/11 2:25 pm] sangita bhandwale: स्पर्धेसाठी
चित्रचारोली

नशिबाची फरपट भोग गरीबिचे
आंम्हा ना तमा ऊन,वारा पावसाची
मायबाप सरकार असो वा जन्मदाते
कुणालाच नाही चिंता आमच्या भविष्याची??

✍🏻संगीता भांडवले✍🏻
      वाशी ,उस्मानाबाद
[21/11 2:28 pm] sangita bhandwale: घर दोघांचे
स्वप्नांचा इमला
घरपण हरवल्याने
रिता झाला बंगला

✍🏻संगीता भांडवले✍🏻
      वाशी,उस्मानाबाद
[28/11 10:31 pm] sangita bhandwale: नको रुसवे फुगवे
नको हेवेदावे
सामंजस्याने कसे रहावे
हे मुक्या प्राण्याकडुन शिकावे(स्पर्धेसाठी)

संगीता भांडवले
वाशी उस्मानाबाद
[03/12 11:52 pm] sangita bhandwale: स्पर्धेसाठी

आत्मा ईश्वर हेच सत्य रे
नको संपत्तीचा हव्यास
दिनदुबळ्यात  ईश्वर पाहून
द्यावा त्यांनाही सुखाचा घास

✍🏼संगीता भांडवले✍🏼
     वाशी,उस्मानाबाद
[07/12 6:29 pm] sangita bhandwale: स्पर्धेसाठी

° जीवनाची पायरी °

जीवनाची पायरी चढताना
नका करु पर्वा संकटाची
यशाचे  अत्युच्च शिखर गाठता
विसरुन जाल व्यथा संघर्षाची

✍🏼संगीता भांडवले✍🏼
     वाशी उस्मानाबाद

No comments:

Post a Comment