Sunday, December 10, 2017

चारोळ्या ।।अंतरिच्या वेदना।।

1.
कुणास सांगु  प्रिया मी
अंतरातल्या त्या वेदना
नाही जाणल्यास तु ही
माझ्या अबोल भावना


म्हाता-या मायबापाची
अडचण होते पोरांना
जाणेल का हो कुणी त्यांच्या
अंतरातल्या त्या वेदना

३.

माझ्या अश्रुच्या मोलाची
काय किंमत जग रहाटीला
अंतरातील त्या वेदनेनं
जिवंत ठेवले प्रेमाला

४.
अनाथ निराधार मुलं
अन्नासाठी भटकतात
अंतरातल्या त्यांच्या वेदना
मन हेलावुन सोडतात

५.
अंतरातल्या त्या वेदना
अस्वस्थ करतात मनाला
गुपीतही खोलता येईना
संवाद करु कुणाला

६.
अंतरातील त्या वेदनेनं
बावरी झाली कृष्णसखी
नजर लावुनी वृंदावनी
अजुनही दारातच उभी

७.
अंतरातील त्या वेदना
सांगु आता मी कुणाला
नाही कुणीच जवळचे
मुरड घालते मनाला

८.
गरीबीची झळ लागे
निरागस बालकांना
जाणेल का कुणी त्यांच्या
अंतरातल्या त्या वेदना

९.
अंतरातल्या त्या वेदना
घेशील का रे जाणुन
सुख दु:खाच्या धाग्याने
आयुष्य आनंदाने विणुन

१०.
सख्या तुझ्या विरहाने
मी दिनरात झुरते
अंतरीच्या त्या वेदनांनी
काळीज माझे चिरते

११.
श्वास असेल श्वासात
तोवर जपेन नात्याला
अंतरातल्या त्या वेदना
कशा सांगु मी कुणाला

१२.
माहेराला विसरुनी
केले सासरी नंदनवन
अंतरातल्या त्या वेदना
जपुन ठेवल्या मनोमन

१३.
विरमातेस पुसाव्या
अंतरीच्या त्या वेदना
देशासाठी लढता लढता
जिचा लाडला शहिदला

१४.
भाऊ झाला परका
दुरावली नातीगोती
अंतरीच्या त्या वेदना
मनी रुंजी घालती

१५.
संसार रथाचा गाडा
चालवतेय कौशल्याने
अंतरीच्या त्या वेदना
लपवतेय शिताफिने

✍🏻संगीता भांडवले✍🏻
  वाशी,उस्मानाबाद

Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment